धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करताय… जाणून घ्या आजचे दर

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली जाते. आज कुबेराची जयंती म्हणून धनत्रयोदशीला सोनं आणि चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे. त्यामुळे तुम्हीही या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी  आनंदाची बातमी आहे. कारण आज धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे.

जागतिक बाजारातील कमजोर कलामुळे सोमवारी राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात सोने 10 रुपयांनी किरकोळ घसरून 46,673 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.  त्यामुळे मागील व्यवहारात सोने 46,683 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. चांदीचा भावही 230 रुपयांनी घसरून 63,014 रुपये प्रतिकिलो झाला. मागील ट्रेडिंग सत्रात तो 63,244 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात, सोने आणि चांदी अनुक्रमे 1,783 डॉलर प्रति औंस आणि 23.75 डॉलर प्रति औंसवर जवळपास अपरिवर्तित होते. ‘सोमवारी अमेरिकन कमोडिटी एक्स्चेंज COMEX वर स्पॉट गोल्डच्या किमती $1,783 प्रति औंसवर कायम राहिल्याने सोन्याचे भाव स्थिर राहिले.’

2020 बद्दल बोलायचे झाले तर गेल्या वर्षी याच कालावधीत MCX वर प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज ऑगस्ट फ्युचर्स MCX वर सोने 47,835 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 8,365 रुपयांनी स्वस्त होत आहे.

ऑक्टोबरमधील डिलिव्हरीसाठी सोने आज 0.14 टक्क्यांनी घसरून 47,835 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचवेळी आजच्या व्यवहारात चांदी 0.23 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव 64,641 रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.