धनगर समाजातील महिला उद्योजकांना आवाहन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

धनगर समाजातील पात्र महिला उद्योजकांसाठी स्टँड अप इंडिया योजना सुरू करण्यात आली आहे. धनगर समाजातील महिला नवउद्योजकांना एकूण प्रकल्प किमतीच्या 10 टक्के स्व- हिस्सा भरणा केल्यानंतर व बॅकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येईल.

स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत बँकेने कर्ज मंजूर केलेले असावे. धनगर महिला उद्योजकांनी अर्जासोबत उद्योग, आधार नोंदणी पत्र, जात प्रमाणपत्र व बँकेचे कर्ज मंजुरीचे पत्र जोडणे आवश्यक आहे. या अटींची पूर्तता करत असलेल्या महिला उद्योजकांनी सहाय्य्क आयुक्त, समाजकल्याण मायादेवी मंदिराजवळ, जळगाव यांच्याकडे संपर्क करवा, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.