जळगावात बांधकाम ठेकेदाराचा खून

0

जळगाव : येथून जवळ असलेल्या खेडी येथील पेट्रोल पंपाजवळ आज एका तरुण बांधकाम ठेकेदाराचा खून झाल्याची घटना घडली. ही घटना सकाळी १० च्या सुमारास घडली. विपिन दिनकर मोरे (वय ३५ रा. खेडी) असे या बांधकाम ठेकेदाराचे नाव आहे.

दरम्यान, विपिनसिंग आणि मारेकऱ्यांमध्ये अनेक दिवसापासून वाद होता. अनेकवेळा पोलिसात तक्रारी देखील झाल्या होत्या. परंतू आज थेट या वादातून विपिनचा खूनच झाला. घटनेची माहिती कळताच तालुका पोलिसांनी धाव घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.