धक्कादायक : कमरेखालचा भाग तुटलेले मृत अर्भक घराच्या छतावर, पारोळा शहरातील खळबळजनक प्रकार (व्हिडीओ)

0

पारोळा  | प्रतिनिधी 

शहरात हवलदार मोहल्ला परिसरात कंमरेपासून पाय नसलेला स्थितीत एका नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला आहे.पारोळा शहरात याघटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतला असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील हवलदार मोहल्ला परिसरात राहणारे इबा  या व्यक्तीच्या घरातील महिला आज सकाळी १० वाजता कपडे टाकण्यासाठी छतावर गेले असता त्यांना कंमरेपासून पाय नसलेला स्थितीत एका नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे पारोळा शहरात खळबळ उडाली आहे. नेमके हे बालकाच्या पालकांचा थांग पत्ता लागलेला नसला तरी घराच्या छतावर त्याला कुणी आणून टाकले ? कमरे खालचे शरीर छतावर आणून टाकण्यापुर्वी तुटलेले होते की छतावर कुत्र्यांनी त्याचे लचके तोडले ? काहीही झाले तरी अश्या परिस्थितीत या नवजात अर्भकाला अशा विचित्र पध्दतीने छतावर टाकून देणारे निर्दयी लोक कोण असावेत ? या बालकाचा जन्म विवाह बाह्य संबंधातून झालेला असला तरी त्याचे शरीर असे तुटलेल्या अवस्थेत समोर दिसते आहे. मात्र हे घडले कसे ? अश्या प्रश्नांची मालिका सर्वांनाच अस्वस्थ करणारी आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.