देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या 10 पैकी 7 शहरे एकट्या महाराष्ट्रातील

0

मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. मागील महिन्यापासून राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येने गंभीर परिस्थिती बनली आहे. त्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सारख्या मोठ्या शहरांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. अशावेळी राज्याची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आलीय. देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या पहिल्या 10 शहरांपैकी 7 शहरं एकट्या महाराष्ट्रातील आहे. तर अन्य 3 शहरे ही अनुक्रमे कर्नाटक, छत्तीसगड आणि दिल्ली आहेत.

महाराष्ट्रातील कोणत्या शहरात चिंताजनक स्थिती? (शहरे आणि अॅक्टिव्ह रुग्णसंख्या)
पुणे – 81 हजार 378
मुंबई – 73 हजार 281
ठाणे – 57 हजार 635
नागपूर – 55 हजार 926
नाशिक – 34 हजार ५४०
औरंगाबाद – 16 हजार 818
अहमदनगर – 17 हजार 716

तर पहिल्या 10 शहरांमध्ये बंगळुरु शहर (30 हजार 782), दिल्ली (14 हजार 579) तर दुर्ग (12 हजार 589) या शहरांचाही समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.