मंगळग्रह सेवा संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी

0

अमळनेर (प्रतिनिधी):-शहरासह तालुक्यात कोविड ची परिस्थिती दिवसेंदिवस वाढत असतांना उपचारासाठी असलेली खाजगी रुग्णालये कधीच पूर्ण क्षमतेने भरली असुन सर्वसामान्य परिस्थिती असणाऱ्या रुग्णांची हेळसांड पाहुन प्रशासनाने तालुक्यातील सामाजिक,राजकीय संस्था व व्यक्तींना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. यासारख्या आवाहनांना दरवेळेस प्रतिसाद देणारी मंगळग्रह सेवा संस्था यावेळी प्रशासनाच्या तसेच नागरिकांच्या मदतीसाठी पुढे आली.

मंगळग्रह सेवा संस्था केवळ एक धर्मस्थळ नसून सामाजिक जाणिवेचे उचित भान ठेवणारी समाजसेवी संस्था आहे. याची प्रचिती दीर्घकाळापासून वेळोवेळी सर्वांनाच आली आहे .आताही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने साद दिल्याबरोबर संस्थेने एक लाख रुपयांचा धनादेश प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना दिला. हाच धनादेश वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांना सुपूर्द करण्यात आला.

या धनादेशातून लोकसहभागातून प्रशासनाने उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी ऑक्सिजनची सोय करण्यात येणार आहे .
संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने धनादेश प्रशासनाला सुपूर्द करण्यात आला. धनादेश देताना संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील ,सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव.

Leave A Reply

Your email address will not be published.