देशात गेल्या 24 तासात 96 हजार 551 विक्रमी रुग्णांची नोंद

0

नवी दिल्ली: देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या दोन दिवसांपासून देशात ९० हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत आहे.  गेल्या २४ तासांत देशात 96 हजार 551 नवीन रुग्ण आढळून आले आहे.तर 1209 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 सप्टेंबरपासून देशात दररोज हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. रुग्ण संख्येबाबत अमेरिकेनंतर भारत जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात सध्या कोरोनाची लागण होणारी एकूण संख्या 45 लाख 62 हजार 415 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे ३५ लाख ४२ हजार ६६४ जणांनी करोनावर मात केली आहे. भारतातील करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण इतर देशांपेक्षा चांगलं आहे. देशात सध्या ९ लाख ४३ हजार ४८० करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. निरोगी लोकांची संख्या संक्रमणाच्या सक्रिय प्रकरणांच्या संख्येपेक्षा जवळपास तीन पट जास्त आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.