दुष्काळ निधी वितरणा विषयी प्रशासन अनभिज्ञ ः लाभार्थ्यांना मार्गदर्शन मिळेना

0

महसुल विभागकडून केवळ माहिती अपलोड करण्याचे कार्य – जिल्हा प्रशासन

जळगांव –
दरवर्षी दुष्काळाशी संकटांना सामोरे जाणार्‍या शेतकर्‍यांना थोड्याफार प्रमाणात का होईना दिलासा म्हणून राज्य शासनाने हेक्टरी मदत जाहिर केली होती. तर केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत दरवर्षी सहा हजार रूपये मदत देण्यात येणार असल्याचे जाहिर केले होते. त्याचा सर्वेक्षण देखिल युद्धपातळीवर मोठा गाजावाजा करीत 26 फेब्रुवारी पर्यत सुमारे 89 टक्के पात्र शेतकर्‍यांची माहिती संकलन करून अपलोड करण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले होते.परंतु राष्ट्रीयीकृत बॅक वगळता जिल्हा बॅकेच्या ग्रामीण स्तरावरील शाखांमधे विकासोच्या सभासद असलेल्या शेतकर्‍यांच्या खात्यांवर अजुनही दुष्काळ मदत प्राप्त झाली नसल्याचे चित्र आहे. तर जिल्हा प्रशासनाकडून तालुकास्तरावर दुष्काळनिधी मिळाला की नाही याची माहिती आमच्याकडे नाही असे जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसिलदार यांनी सांगीतले.
राज्य तसेच केंद्र शासनाकडून आचार संहिता लागण्यापुर्वीच 26 फेब्रुवारी पर्यत पात्र शेतकर्‍यांची माहिती भरणेचे कार्य युद्ध पातळीवरून जिल्हा प्रशासनाकडून सुरू होते. जिल्ह्यातील 1हजार 502 गांवापैकी 1452 गावांतील 2लाख 35 हजार 323 पात्र शेतकरी कुटुबांची माहिती अपलोड करण्यात आले असल्याचा हा दावा फोल ठरल्या असल्याचे चित्र आहे. राज्य शासनाने हेक्टरी 6 हजार 800 जिरायत व बागायतीसाठी 13 हजार अशी मदत जाहिर केली होती. याच प्रमाणे केंद्र शासनाने देखिल दोन हेक्टर जमीन धारण करणारे शेतकरी अशा पात्र शेतकर्‍यांना वार्षिक 6 हजार रूपये तीन समान हप्तात देण्याचे जाहिर करण्यात आल होते.
त्यानुसार राज्याच्या दुष्ळाळ पाहणी समितीने दिलेल्या अहवालानुसार शेतकर्‍यांना दुष्काळनिधी देण्यात येणार होता. त्या सोबतच केंद्र शासनाने देखिल प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत ग्रमीण पातळीवर सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते.
राज्य शासनाच्या दुष्काळ निधी शेतकर्‍यांच्या विविध कार्यकारी सोसायटीचे पीक कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकर्‍यांच्या बॅक खाते नंबर आणि आधार क्रमांक घेवून अन्य आवश्यक माहिती संकलन करण्यात आली होती. सोबतच प्रधानमंत्री किसान योजनेचे देखिल पात्र शेतकरी यादी तालुकास्तरावरून ग्रामसेवक, कृषि सहायक, तलाठी आदी कर्मचार्‍यांमार्फत माहिती संकलन करण्यात येवून त्याचा आढावा तहसिलदारांकडे देण्यात आला होता. त्यात जिल्हाभरात 1502 गावातील 6 लाख 91 हजार 979 खातेदार शेतकर्‍यांपैकी 1हजार 452 गावातील 2 लाख 87 हजार 344 शेतकरी कुटुबांचीपरीपूर्ण माहिती संकलित करण्यात येवून सूमारे 89 टक्के माहिती अपलोड करण्यात आलेली आहे.
या योजनेतील दोन हजार रूपयांचा पहिला हप्ता जवळच्याच नगर, नाशिक आदी जिल्हयातील शेतकर्‍याच्या बॅक खात्यावर बहुतेक ठिकाणी जमा झाला असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार जिल्हयातील बहुतांश शेतकर्‍यांचे खाते असलेल्या तसेच ग्रामीण स्तरावर शेतकर्‍यांशी संबंधित कृषि पिक कर्ज उपलब्ध करून देणार्‍या विविध कार्यकारी सोसायटयांचे खातेदार असलेल्या शेतकर्‍यांचे खाते जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या तालुक्याच्या अथवा जवळच्या ठिकाणी असलेल्या बॅकेत आहे. जिल्हा प्रशासनाकडून माहिती अपलोड करण्यात आली असून शेतकर्‍यांच्या खात्यावर निधी मिळाला किंवा नाही हे माहित नाही. असे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे तर संबंधित जिल्हा बॅकेच्या तालुका तसेच ग्रामीण शाखेत माहिती घेतील असता निधी मिळालेला नाही आणि आचारसंह्तिा हे त्यास अडचणीचे कारण नाही असे देखिल जळगांव जिल्हा मध्यवर्ती बँकच नव्हेतर धुळे जिल्हा बॅकेच्या अधिकारी यांनी देखिल म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.