दुचाकींमधून पेट्रोल चोरी करणाऱ्या तरुणाला बेदम चोप

0

हरिविठ्ठल नगरातील घटना ; नागरिकांनी केले पोलिसांच्या स्वाधीन

जळगाव :- हरीविट्ठल नगरमधील राजपूत कॉलनीत बऱ्याच दिवसांपासून आजूबाजूच्या परिसरात दररोज उभ्या असलेल्या मोटारसायकलींमधून पेट्रोल नळी काढून चक्क 2 लिटरची बिसलरी बॉटल लावून सर्रास पेट्रोल चोरी होण्याच्या प्रकाराला येथील नागरिक वैतागले होते . आज शनिवार २६ रोजी पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास मनोज कन्हैय्यालाल वाघोदकर या युवकाने येथील ऍड . सज्जन चौहान यांच्या मोटरसाइकलमधून पेट्रोल काढत असताना घराच्या गच्चीवर झोपलेल्या वकील यांचे काका हिलालसिंग जूलालसिंग पाटिल यांनी मनोजला पकडले असता त्याने त्यांना धक्का देत तेथून पळ काढला श्री.पाटिल यांनी आऱडा ओरड़ा केला असतायेथील रहिवाशी तथा रि. पा.इं युवा जिल्हासरचिटणीस मिलिंद तायडे यांना प्रकार लक्षात येताच त्यांनी चोराला थेट घरातून बाहेर काढून चांगलाच चोप दिला. नंतर रामानंद पोलीस स्टेशनला फोन करून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत चोरट्याला ताब्यात घेतले . त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते .

Leave A Reply

Your email address will not be published.