दिलासादायक बातमी ! जिल्ह्यातील ८३ कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

0

जळगाव : खाजगी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविलेल्या पैकी 83 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यात सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा संख्या ९५७ इतकी झाली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असतांना बरे होणाऱ्या रूग्णांची संख्यादेखील वाढीस लागल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.