दिलासादायक बातमी; जिल्ह्यात आज कोरोनामुळे एकही मृत्यू नाही ; ६४ नवीन रुग्ण

0

जळगाव प्रतिनिधी । कोरोना संसर्गाच्या दृष्टीने जिल्ह्यासाठी सोमवारचा दिवस दिलासादायक ठरल्यानंतर आज बाधित रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे अहवालात दिसून येत आहे. आज दिवसभरात ६४ बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर आज ९१ रुग्ण बरे झाले आहे.

जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरच्या १७ तारखेनंतर सातत्याने नव्या कोरोना बाधितांचा आकडा घटत असून संसर्गाचा आलेखही खाली येत आहे.  आज जिल्ह्यात ६४ रुग्ण आढळून आले असून एकुण बाधितांचा आकडा ५३ हजार ३२९ वर गेला आहे. त्यापैकी ५१ हजार ३६७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. दिलासादायक असे की, जिल्ह्यातील बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ९६.३२ वर गेला आहे. तर ६९३ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान, आज एकही रूग्णाचा मृत्यू झाला नाही.  एकुण मृत्यूचा आकडा १ हजार २६९ रूग्णांचा मृत्यू झालाय.

आजची आकडेवारी
जळगाव शहर-२८, जळगाव ग्रामीण-४, भुसावळ-९, अमळनेर-५, चोपडा-६, धरणगाव ०१, यावल ०१, जामनेर ०२, रावेर ०१, पारोळा २, बोदवड ०३,  इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ६४ रूग्ण बाधित आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.