दिलासादायक ! देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्क्यांच्या पुढे ; पाहा २४ तासातील आकडेवारी

0

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा वेग मंदवताना दिसत आहे. मात्र,  मुंबई आणि दिल्ली सारख्या महानगरांतील रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वेगानं वाढायला लागली आहे. गेल्या चोवीस तासांत देशात नव्याने ४८,२६८ रुग्ण आढळून आले तर ५५१ जणांचा मृत्यू झाला.

 

नव्या रुग्णांच्या नोंदीमुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ८१,३७,११९ वर पोहोचली आहे. तर मृतांची एकूण संख्या १,२१,६४१ वर पोहोचली आहे. तसेच ५९,४५४ रुग्ण व्यवस्थित बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७४,३२,८२९ वर पोहोचली आहे.

 

देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.१५ टक्क्यांवर पोहोचले आहे. सप्टेंबरच्या मध्यावर शिखर गाठल्यानंतर कोरोनाचा ग्राफ आता ५० टक्क्यांनी खाली घसरला आहे. रुग्ण आणि मृत्यूच्या वाढीच्या तुलनेत घट झाल्याचं स्पष्ट होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.