दिलासादायक : जिल्ह्यात आज १०३४ रुग्णांची नोंद ; तर १२०४ रुग्ण झाले बरे

0

जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा गेल्या महिनाभरापासून सुरु असलेला संसर्ग दर स्थिर आहे. दरम्यान, आज गुरुवारी जळगाव जिल्ह्यात बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त आहे.

आज नव्या १०३४ रुग्णांची नोंद झाली तर १२०४ रुग्ण बरे झाले. तर जिल्ह्यात दिवसभरातील मृत्युंची संख्या १८ नोंदली गेली. तर जळगाव शहरात सर्वाधिक रुग्ण समोर आले.

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख १३ हजार ७०४  बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख  ७५८  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज १८ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताचा आकडा २०१६ वर गेला आहे. जिल्ह्यात सध्या १०  हजार ९३०  बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.

आजचे रुग्ण

जळगाव शहर- १७५, जळगाव ग्रामीण- ४७, भुसावळ- ८६, अमळनेर- ६७, चोपडा- ५८, पाचोरा- ५३, भडगाव- १०, धरणगाव- ४२, यावल- ६७, एरंडोल- ५४, जामनेर- १११, रावेर- ९६, पारोळा- २४, चाळीसगाव- ४९, मुक्ताईनगर- १८, बोदवड- ७० आणि इतर जिल्हे ७ असे एकुण १०३४ बाधित रूग्ण आढळले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.