दम्यामुळे अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीचा मृत्यू

0

काबूल (वृत्तसंस्था ) – अल कायदा या अतिजहाल आणि क्रूर दहशतवादी संघटनेची सूत्रे ओसमा बिन लादेनच्या मृत्युनंतर ज्याच्या हातात होती त्या अल जवाहिरीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्थान मधील काही सूत्रांकडून या संदर्भात या बातमीला दुजोरा दिला गेला आहे. त्या हवाल्यावरून अरब न्यूजने दिलेल्या बातमीनुसार अल जवाहिरी याला दम्याचा त्रास होता पण शेवटपर्यंत त्याला उपचार मिळू शकले नाहीत आणि त्यात त्याचा मृत्यू ओढवला आहे.

सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली गेली आहे. या वर्षात ९/११ हल्ल्याच्या स्मरणदिनी अल जवाहिरी एक व्हिडीओ संदेश देताना शेवटचा पाहिला गेला होता. न्युयॉर्क टाईम्सचा पत्रकार हसन याने ट्विटरवर या संदर्भात माहिती देताना अल जवाहिरी एक महिन्यापूर्वीच मेल्याचा दावा केला आहे. अल कायदा त्यांच्या सदस्यांच्या मृत्यूच्या बातम्या कधीच बाहेर जाऊ देत नाही. अफगाणीस्तान मधील गजनी या गावात अल जवाहीरीचा मृत्यू झाल्याचे समजते. त्याच्या अंतिम संस्कारात खुपच कमी गर्दी होती असेही सांगितले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.