वीज बिल 50 टक्के माफ होत नाही तो पर्यंत वीजबिल भरू नये -ना. रामदास आठवले

0

मुंबई – कोरोनाच्या संकट काळात राज्य सरकार ने मागील 8 महिने लॉकडाऊन केले त्या लॉकडाऊनच्या काळात कोणताही रोजगार कामधंदा नसल्याने सामान्य जनता दुर्धर आर्थिक संकटाला तोंड देत आहे. अशा काळात राज्य सरकार ने जनतेच्या पाठीशी उभे राहिणे आवश्यक असून वीजबिलाची मोठी रक्कम जनता भरू शकत नाही त्यामुळे सरसकट सामान्य जनतेला वीजबिल 50 टक्के माफ करावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

वीज वापरली हे खरे असले तरी लॉकडाऊनच्या काळात जनतेला रोजगार काम धंदा आर्थिक उत्पन्न नसल्याने गरीब सामान्य माणसांचे हित पाहणे राज्य सरकार चे काम आहे. त्यामुळे वीज वापरली आहे तर सर्व वीज बिल भरा ही राज्य सरकार ची भूमिका चुकीचा आहे.माझे जनतेला आवाहन आहे की जो पर्यंत वीज बिल 50 टक्के माफ होत नाही तो पर्यंत वीजबिल भरू नये असे -ना. रामदास आठवले यांनी आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.