दबंग सलमान खान पुन्हा एकदा अडचणीत ; तक्रार दाखल

0

मुंबई :  बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. मुंबईस्थित एका पत्रकाराने सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा विरोधात मंगळवारी रात्री उशीरा महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गैरवर्तणूक, शिवीगाळ असे आरोप त्याच्यावर करण्यात आले आहे.

अशोक एस. पांडे यांनी अंधेरी न्यायालयात सलमान, त्याचा सहकारी विजय आणि आणखी एका अज्ञात इसमाविरोधात तक्रार नोंदवल्याची माहिती वकिलांकडून देण्यात आली. १२ जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी आहे. त्याचवेळी या प्रकरणात पोलीस तपासणीचे आदेश दिले जाणार की, न्यायालयाकडून सलमानला समन्स बजावण्यात येणार याविषयीचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहितीही वकील नीरज गुप्ता यांनी वृत्तसंस्थेला दिली.  डी. एन. नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली मात्र गुन्हा नोंदवला जात नसल्यामुळे पांडे यांनी थेट न्यायालयात धाव घेतली. पांड्ये यांचे वकील नीरज गुप्ता आणि निशा आरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान खान आणि बॉडीगार्ड शेराविरोधात भा. दं. वि. 323, 392, 426, 506, आणि 34 या अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. १२ जुलै रोजी या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.