तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी

0

मुंबई – शिवसेनेतून तृप्ती सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी कायम ठेवत उमेदवारी मागे घेण्याचा दबाव झुगारुन लढण्याचा निर्धार ठेवला आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती देण्यात आली आहे.

शिवसेनेने वांद्रे पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या तृप्ती सावंत यांनी अपक्ष अर्ज भरत युतीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केली आहे. तृप्ती सावंत यांनी माघार घ्यावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही प्रयत्न केले मात्र ते प्रयत्न अयशस्वी ठरले. तृप्ती सावंत या निष्ठावंत शिवसैनिक बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत. बाळा सावंत वांद्र पूर्व येथून आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र त्यांच्या निधनाने या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.