तिवसा येथिल जिलेटिन व डीटोनेटर स्फोटक प्रकरणात आणखी 2 आरोपिनां अटक !

0

 अमरावति  | प्रतिनिधि  रामचंद्र मुदांने

तिवसा येथील पंचवटी चौकामध्ये .शुक्रवारि रात्रि 8ते9 च्या दरम्यान तब्बल पंचवीस किलो जिलेटिन कांडय़ा सह 200 नग डिटोनेटर पोलिसांनी जप्त केले होते .  सदर प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडालेली होति .तिवसा ग्रामीण पोलिसांनी  एका आरोपीला अटक केलेली होति. तर या प्रकरणातील दोन आरोपी मात्र फरार झाला होते.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकामध्ये  पेट्रोलिंग करीत असलेल्या पोलिसा समोरून  संशयितरीत्या एका दुचाकीवर दोन युवक अतीशय वेगाने  जात असताना . त्याच्याजवळ मद्य असल्याचा  संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता. सदर आरोपींनी त्याच्याजवळील जिलेटिन व डेटोनेटर ने भरलेली पिशवी सोडून पळाले होते .  पोलिसांनी ति पिशवि पोलीस स्टेशन मध्ये जमा करून त्याची माहिती वरिष्ठांना दिली होति.

पोलिसांनि पळालेल्या युवकाची माहिती घेतल्यानंतर सदर युवक हा तिवसा नजीकच्या सातरगाव येथिल सुमीत अनिल सोनवणे  असल्याच्या माहिती मिळाल्यावरुन पोलिसांनी सदर आरोपीला रात्रीच ताब्यात घेऊन विचारपूस केली असता . त्याने पंचवीस किलो स्फोटके डिटोनेटर हे वरुड तालुक्यातील  करजगाव लोणी  येथील अंकुश लांडगे  याला विकल्याची कबुली दिली . व तो नेहमीच   विहिरी फोडण्यासाठी जिलेटिन व डिटोनेटर विकत नेत असल्याचि कबुलि दिलि होति.

पोलिसांनी सुमित सोनवणे च्या कबुली जबाबावरून  अंकुश लांडगे कडे मोर्चा वळवीताच त्याची चाहूल लागल्याने . 2आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. स्थानिक गून्हे शाखा पोलिसांनि फरार आरोपिंचा शोध घेऊन करजगाव येथून अंकुश लांडगे व संदीप पातुरकर या दोघांना उशिरा रात्री अटक केली आहे यातील आरोपींची  संख्या तीन झाली आहे ही कारवाई  स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक तपण कोल्हे ,यांच्या मार्गदर्शनात पीएसआय विजय गराड, स.पो.उपनि.मुलचंद भांबुरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील केवतकर , नायक पोलीस शिपाई यशवंत दाभणे, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, राहुल सोलव ,तसेच सायबर सेलच्या सरिता चौधरी यांनी केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.