तापी पुलावरून उडी घेऊन २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या

0

जळगाव : विदगावजवळील तापी पुलावरून एका २३ वर्षीय तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (मंगळवारी) सकाळी घडली. हरीषचंद्र दिलीप धनगर (बाविस्कर) (वय-२३ रा. दहीगाव ता.यावल) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

हरीषचंद्र धनगर (बाविस्कर) याने सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरात कोणाला काहीही न सांगता स्वत:ची दुचाकी (क्रमांक एमएच १९ एजी ६१२२)ने विदगाव गावाच्यापुढे तापी नदीच्या पुलावर आला. यानंतर त्याने दुचाकी पुलावर पार्कींग करून सरळ तापी नदीच्या पुलावरून उडी मारली. यात त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या तरुणाने आत्महत्या का केली, याबाबत कोणतेही कारण स्पष्ट झालेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.