तलाठी हल्ल्यातील फरार आरोपी जेरबंद ;आरोपीला ३ दिवस पोलीस कोठडी

0

अमळनेर (प्रतिनिधी):- येथील पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हा नंबर ४३९/२०२० भादवि ३०७, ३५३, ३३२ व ३७९ प्रमाणे गुन्ह्यात पाहिजे असलेला मुख्य आरोपी संदीप जगन पारधी उर्फ सोनू पारधी व जेसीबी वाहन चालक श्याम राजेंद्र चव्हाण हे फरार होते. म्हणून अमळनेर व चोपडा तलाठी यांच्या संघटनेने लेखणी बंद पुकारले होते. त्या अनुषंगाने तात्काळ दखल म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व त्यांच्या पथकाने मुख्य आरोपी संदीप जगन पारधी उर्फ सोनवणे यांची माहिती तांत्रिक स्वरूपाची तसेच गोपनीय बातमीनुसार आरोपी याच्या लोकेशन वरून पकडण्यासाठी पारोळा हद्दीतील बहादरपुर गावाजवळ सकाळी ०३:०० वाजता त्यास ताब्यात घेतले असून त्याची दि १जुलै रोजी मा. अमळनेर न्यायालयात हजर केले असता ,आरोपीला ३दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.