डोक्यात लाकडी दांडा मारून वृद्धेचा खून पिंपळगाव कमानी तांडा येथील घटना

0

पहुर, ता.जामनेर, वार्ताहर

येथून जवळ असलेल्या पिंपळगाव कमानी तांडा येथे शुल्लक कारणावरून वृद्ध महिलेच्या डोक्यात लाकडी दांडा मारल्याने महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी पिंपळगाव कमानी तांडा येथे घडले. याप्रकरणी पहूर पोलिसांनी आरोपीला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, पिंपळगाव कमानी तांडा येथील गुजरात सावजी राठोड याने शुल्लक कारणावरून शांताबाई मदन चव्हाण (वय – ६०) या वृद्ध महिलेच्या डोक्यात लाकडी दांडा मारले मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी आठ वाजता घडली. आंगणात बैलगाडी सोडण्याच्या कारणावरून शांताबाई मदन चव्हाण व भोजराज सावजी राठोड यांच्यात जोरदार भांडण झाले. भांडणाचे हाणामारीत रूपांतर झाले. यादरम्यान महिला जमिनीवर कोसळली. रक्तस्राव मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने शांताबाई चव्हाण यांना तात्काळ पहूर ग्रामीण रुग्णालय उपचारार्थ दाखल केले असता प्राथमिक उपचार करून जामनेर येथे उपजिल्हा रुग्णालय नेत असताना शांताबाई चव्हाण यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश काळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. आरोपी भोजराज सावजी राठोड याला तात्काळ अटक करून याच्या विरोधात पहूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश काळे हे करीत आहे.
आरोपीने स्वतः डोक्यात मारून घेवून दवाखान्यात दाखल झाला होता. त्या वृद्धेचा मृत्यू झाल्याचे समजताच तो दवाखान्यातून फरार झाला होता. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश काळे यांनी पोलिस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव अंगले यांच्याशी चर्चा करून जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या सहकार्याने आरोपीला सापळा रचून जळगाव येथे पकडले. सहाय्यक फौजदार अनिल अहिरे कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल भरत लिंगायत करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.