डॉक्टरांचा २ एप्रिलचा देशव्यापी संप मागे

0

मुंबई 

डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी २ एप्रिल रोजी पुकारलेला देशव्यापी संपतात्पुरता मागे घेतला आहे. डॉक्टरांच्या या निर्णयामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. २ एप्रिल रोजी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडल्यानंतर संपाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

डॉक्टरांनी नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला विरोध दर्शवला आहे. हे विधेयक केंद्र सरकारने फेटाळून लावावे यासाठी देशभरातील डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसले आहे. म्हणूनच त्यांनी २ एप्रिलला देशव्यापी संपाची हाक दिली होती. डॉक्टरांच्या विरोधानंतर संसदीय समितीने सरकारला या विधेयकात काही बदल करण्याच्या सूचना केल्या होत्या. यातील काही सूचना सरकारने मान्य केल्या. परंतु, डॉक्टर यावर समाधानी नाहीत. डॉक्टरांनी या विधेयकात आणखी बदल सुचवले आहेत. हे बदल केले नाही तर येत्या २ एप्रिलला देशव्यापी संप पुकारू असा इशारा डॉक्टरांनी दिला होता. परंतु, केंद्रीयमंत्र्यांसोबत बैठक होणार असल्याने हा संप तात्पुरता लांबणीवर टाकला आहे. डॉक्टरांचं शिष्टमंडळ २ एप्रिल रोजी आरोग्यमंत्र्यांना भेटणार असून त्यानंतर संपाबाबतचा निर्णय होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.