जैन इरिगेशनला विदर्भातील एकात्मिक सूक्ष्म सिंचन प्रकल्पाची 239 कोटीची ऑर्डर

0

 

20 हजार 748 एकर क्षेत्र ओलीताखाली; 10 हजारहून अधिक शेतकऱ्यांना होणार लाभ

जळगाव, 23 मे (प्रतिनिधी):- जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमीटेडला विदर्भातील एकात्मिक सूक्ष्मसिंचन प्रकल्पाची 239.17 कोटी रूपयांची ऑर्डर मिळाली. ई-टेंडरींग प्रक्रियेतून ही ऑर्डर प्राप्त झाली. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात हा प्रकल्प कार्यान्वीत होईल. प्रकल्पातुन 20 हजार 748 एकर क्षेत्र ओलीताखाली येणार असून त्याचा लाभ 10 हजारहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. हा प्रकल्प 24 महिन्यात पूर्ण करावयाचा आहे.

विदर्भातील शेतीची सद्यस्थिती पाहता शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक सिंचन प्रकल्प उभारण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. काही प्रकल्पांच्या माध्यमातून मर्यादित शेतजमीन सिंचनाखाली आली आहे. विदर्भात कोरडवाहू शेतकऱ्यांची संख्या वाढतच राहिली. या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम काटेकोर वापर व्हावा त्यासाठी अत्याधुनिक सिंचन तंत्रज्ञान वापरणे आवश्यक आहे. यासाठी नागपूर येथिल विदर्भ डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे ‘स्त्रोतापासून थेट मुळापर्यंत’ (रिसोर्स टू रूट) या संकल्पनेवर आधारित ‘हर खेत को पानी’ हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्प क्षेत्रांतर्गत 65 खेड्यातील 10 हजारहून अधिक शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा प्रत्यक्ष लाभ होईल. यामध्ये सुमारे 20 हजार 748 एकर शेतजमीन ओलीताखाली येईल. हा स्वयंचलित सिंचन प्रकल्प असून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (पीएमकेएसवाय) मार्गदर्शक तत्त्वावर आधारीत आहे. पाण्यासाठी पाईप वितरण जाळे उभारण्यात येईल. त्यामुळे ‘हर खेत को पानी’ प्रत्यक्षात येईल. तसेच या प्रकल्पातील ऑनफार्म सूक्ष्मसिंचन प्रणालीमुळे ‘पाणी थेंबाने, पीक जोमाने’ या जैन इरिगेशनच्या ब्रिद वाक्यानुसार शेतीची उत्पादकता वाढेल तसेच शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचा मार्ग गवसेल.

लोअर वर्धा सिंचन प्रकल्पाची प्रोजेक्ट डिव्हीजन वर्धा या प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे. परंपरागत सिंचन प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची आव्हाने आणि खुल्या कॅनॉल करण्यास असलेला तेथील शेतकऱ्यांचा विरोध यामुळे हा विभाग या प्रकल्पासाठी काम करत आहे. भारत सरकारच्या सूचनेनुसार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेखाली पाणी वापर कार्यक्षमतेत प्रकल्प क्षेत्रात सध्याच्या 35 टक्क्यांवरून 90 टक्के इतकी दाबयुक्त पाईप वितरण जाळे आणि ऑनफार्म सूक्ष्म सिंचन (ठिबक, तुषार) सुधार केला जाईल.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये –

– लोअर वर्धा प्रकल्पातील जलाशयातील पाण्याची उचल करून ते प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत ऑनफार्म सूक्ष्म सिंचन (ठिबक/तुषार) च्या मदतीने पोहोचवले जाईल.

– जैन इरिगेशन ईपीसी, टर्नकी कंत्राटात पुढील कामे पूर्ण करेल. यात प्रकल्पाच्या उभारणीच्या दृष्टीने सगळ्या प्रकारची पाहणी, संपूर्ण प्रणाली, रचना, डिझाईन, संबंधित संस्थांची मंजूरी याचे नियोजन.

– अॅप्रोच चॅनेल, पंपहाऊस आणि त्याचे घटक, नियंत्रण कक्ष, अंतर्गत रस्ते, वॉल कंपाऊंट आणि स्टीलचे छोटे प्रवेशद्वार याचे बांधकाम केले जाईल.

– एक हेक्टर जमिनीखालील दाबयुक्त पाईप वितरण जाळे उभारण्यासाठी मुख्य लाईन, उपलाईन. प्रायमरी सेकंडरी फर्टीगेशन युनिट. फिल्टरेशन युनिट्स. वेगवेगळ्या प्रकारचे व्हॉल्स. पाणी मोजदाद करणारी यंत्रणा कार्यान्वीत करणे.

– एमएसईटीसीएल / एमएसईडीसीएल यांच्याकडून विजेच्या उच्च व कमी दाबाच्या विद्युत वाहिन्यांचा आर्वी सबस्टेशन ते पंपिंग स्टेशनपर्यंत पुरवठा करून उभारणी व कार्यान्वित करणे. त्याची चाचणी घेणे ही कामे जैन इरिगेशनला करावी लागतील.

– त्याचप्रमाणे सर्व पूरक घटक व वैधानिक संस्थांकडून आवश्यक संमती मिळवणे. 33 केव्ही सबस्टेशन आणि स्विच यार्ड उभारणे.

– वेबवरील आधारीत स्कॅडा (SCADA) या स्वयंचलित यंत्रणेद्वारे पंप्स, फिल्टर्स, ॲटी-सर्च उपकरणे, व्हॉल्व आणि वायरलेस फिल्ड कंट्रोल युनिट्स यांची चाचणी घेवून कार्यान्वित करून देणे.

– महाराष्ट्र शासनाच्या एनएमएमआय मार्गदर्शक तत्वांनुसार ठिबक सिंचन प्रणालीतील 75 टक्के क्षेत्र (सीसीए-6300 हेक्टर) आणि स्थिर स्प्रिंकलर सिस्टीम (सीसीए-2 हजार 100 हेक्टर) यांचा पुरवठा, उभारणी आणि चाचणी (टेस्टींग) ही कामे केले जातील.

– आरसीसी शेतकरी प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करणे. एमएमआयएसएफ या कायद्यानुसार पाणी वापर संस्था गठीत करून या योजनेबाबत शेतकऱ्यांना जनजागृतीपर परिणामकारक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे.

या प्रकल्पाची 5 वर्षांपर्यंतची देखभालीची जबाबदारी कंपनीची असेल.
“या प्रकल्पाच्या माध्यमातुन पाण्याचा अत्यंत कार्यक्षमपणे उपयोग साध्य होईल. विदर्भातील या प्रकल्प परिसरात सध्या 35 टक्क्यावरून 90 टक्के इतका कार्यक्षम पाण्याचा वापर सुधारेल. आमची या प्रकल्पासाठी निवड झाल्याचा कंपनीला सार्थ अभिमान आहे.”

-अजित जैन, सहव्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन सिस्टीम लिमीटेड

Leave A Reply

Your email address will not be published.