जीएम-थ्री गृप तर्फे आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद

0

जळगाव, दि. 28 –
शहरातील जुना खेडीरोड येथे जीएम-थ्री गृप (गायत्री माता मित्र मंडळ ) व ऑर्कीड हॉस्पीटल आज गुरुवारी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यात ह्दयरोग तपासणी, किडनी विकार व डायलेसीस, न्युरो सर्जरी, कॅन्सर सर्जरी, स्त्रीरोग तपासणी व निदान, अस्थी तपासणी, मणक्याची तपासणी, जनरल सर्जरी, मुत्रविकार तसापणी करण्यात आली. यावेळी डॉ. संदीप साबळे, डॉ. हर्षद शहा, अनिल पाटील (डीघे), जितू सपकाळे,कल्पना गोलाईत यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात २७६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. काही रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला आहे. शिबीर यशस्वतेसाठी विवेक पाटील, हर्षल भुसे, रुपेश पाटील, जितेंद्र महाजन, तुषार पाटील, मिलिंद पाटील, ज्ञानेश्वर सैंदाणे, अनिकेत पाटील,गिरीश सोनवणे,विजय पाटील, गौरव खेडकर, भूषण मुळे, योगेश हडप, सुधाकर चौधरी, महेश चौधरी, चेतन बारी, निलेश बारी, रणजित वाघ यांच्यासह पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.