जि.प. शाळेच्या वर्गखोल्यांचे कुलूप तोडून शासकीय साहित्याचे नुकसान

0

मनवेल ता. यावल (वार्ताहर )

साकळी येथील जि.प.शाळेतील  मुख्याध्यापक कार्यालयाचा  दरवाजा तोडुन कागदपत्रे फेकाफेक करुन नुकसान झाल्याच्या प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे कि,  साकळी येथील जि.प. मराठी मुलीची शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. मंगला सपकाळे यांनी मंगळवारी शाळा उघडली असता त्यांना शाळेतील वर्गाचे कुलूप तोडलेले निर्दशनास आले असता त्यांनी तात्काळ शालेय व्यवस्थापन समिती व स्थानिक पोलीस प्रशासन यांना कळविले. नंतर यांनी घटना स्थळाची पाहणी केली असता,  वर्गातील तसेच कार्यलयातील कपाटाचे कुलूप तोडून शासकीय साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नासधूस करून नुकसान केल्याचे आढळले.

मुख्यध्यापिका सौ मंगला सपकाळे यांनी दिलेल्या  माहितीवरून अज्ञात इसमा विरुद्ध पोलीस प्रशासनास तक्रार दाखल केली आहे.  तसेच  त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी या प्रकारची लेखी तक्रार दाखल केली आहे.  हा प्रकार कोणत्या कारणास्तव घडला व कोणी केला याचा स्थानिक  पोलीस प्रशासन शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.