जि.प. उर्दू शाळेत मोफत पुस्तके वाटप

0

हिंगोणा ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  

येथील  जि.प. उर्दू  शाळेत आज विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटपाचा  कार्यक्रम घेण्यात आला तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मुक्तार शेख हे होते. यावेळी विद्यार्थांना पुस्तक वाटप केली. पुस्तके वाटप शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुक्तार शेख यांच्या हस्ते करण्यात आली.

शाळेत दोन वर्षाच्या कोरोना काळापासुन पुस्तक विदयार्थांना मिळाली नव्हती. आज पुस्तक वाटप करण्यात आले. याकरीता विद्यार्थी वर्ग आनंददायी दिसुन आले.  जि.प. उर्दू शाळेत हाजी युसुप अली जनाब यांनी विदयार्थांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे अध्यक्ष मुक्तार शेख, सदस्य. शब्बीर खान, मुख्यध्यापक अहमद जनाब, आसीफ जनाब, मुक्तार जनाब, केंद्र प्रमुख अलीमोहम्मद जनाब, सल्लाउद्दीन जनाब, फारूकी जनाब, तसेच विदयार्थी वर्ग उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.