जिवंत विजेच्या तारा पडून नऊ जनावरांचा मृत्यू ; पारडी देवी येथील घटना

0

अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती येथून 20 कि.मी. असलेल्या पारडी देवी येथे वादळी पावसाने वडाच्या झाडाच्या फांद्या विजेच्या तारा वर पकडून जिवंत वीज तारा जनावरांच्या अंगावर पडल्याने 9 जनावरांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी 29 जून दुपारी साडेचार वाजता च्या सुमारास घडली.

मंगळवारी दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आला. यामध्ये पार्डी देवी येथील वडाच्या झाडाची फांदी वीज तारांवर पडली. त्यामुळे जिवंत वीज तारा तुटून जनावरांच्या अंगावर पडल्याने यामध्ये जनावरांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे जेथे वीज तारा पडल्या ही गावातील लोकांची बसण्याची जागा आहे. सुदैवाने घटना घडली.

त्यावेळी तेथे कोणीही नव्हते. यामध्ये जवळपास चार ते पाच लाखांचे नुकसान झाले असून घडलेल्या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली असता तलाठी, पोलीस पाटील, कनिष्ठ अभियंता कुटेमाटे, पोलीस निरीक्षक पंजाबराव वंजारी, आपत्ती व्यवस्थापन पशु व आरोग्य अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. एकाच वेळी नऊ जनावरांचा मृत्यू झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये गजानन राऊत, सुभाष बले, महेंद्र भस्मे, सचिन भस्मे, राजू जाखड, नरेश गायधने, नागो मेश्राम, रामभाऊ ठाकरे यांच्या मालकीची गाय व म्हैस  मरण पावली.

Leave A Reply

Your email address will not be published.