जिल्ह्यात 3617 मतदान केंद्र तयार : एकूण 34 लाख 31 हजार मतदार; प्रशासन सज्ज

1

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती 

जळगाव,  –

लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 23 तारखेला मतदान होणार आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत  जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर असे दोन लोकसभा मतदार संघातील मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी रविवारी केले. एकूण 34 लाख 31 हजार 485 पैकी 19 लाख 25 हजार 352 मतदार जळगांव लोकसभा मतदारसंघात आहे तर रावेर लोकसभा मतदारसंघात 17 लाख 73 हजार 107 मतदार आहे. त्यासाठी जिल्ह्यात 3617 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ . अविनाश ढाकणे बोलत होते. या पत्रकार परिषदेतला अपर जिल्हाधिकारी गाडीलकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी हुलवले उपस्थित होते.

मतदानाच्यावेळी मतदारांनी आपला मोबाईल घरीच ठेवून यावे. मतदारांकडे जर मतदान ओळखपत्र नसेल तर आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड, शासनाने दिलेले ओळखपत्र, पेन्शनचे कागदपत्र, पोस्टाचे व बँकेचे पासबुक, पासपोर्ट असे ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार आहे.

कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जमावबंदी आदेश तसेच प्रचारासाठी जिल्ह्याबाहेरुन आलेल्या व्यक्तींना जिल्हा सोडण्याचे आदेशही काढण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील एकही दिव्यांग मतदान मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 15 सुविधा देण्यात येणार आहे. दिव्यांग मतदारांना, गर्भवती महिलांना व वयोवृद्धांना रांगेत उभे न करता थेट मतदानासाठी मतदान कक्षात प्रवेश दिला जाणार आहे. ज्या महिलांची मुले लहान आहे, अशा महिलांच्या मुलांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणाघराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, या मुलांना संभाळण्यासाठी आशा कार्यकर्ती यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. तसेच अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतील डमी मतपत्रिका ठेवण्यात येणार असून त्याद्वारे त्यांना मतदान करता येणार आहे. तसेच ज्यांची दृष्टी कमी आहे, अशा मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर भिंगाची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ईव्हीएम, व्हिव्हिपॅट यंत्रणेबाबत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. या जनजागृतीमध्ये लोकांनी मतदानाचे प्रात्यक्षिक करुन पाहिले आहे. यावेळी सुमारे पाच लाख 20हजार नागरिक उपस्थित होते. जिल्ह्यातील एकूण 362 मतदान केंद्रांवर लाइव्ह वेबकास्टींगच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार आहे. तसेच मतदान प्रकियेसाठी 606 वाहने अधिग्रहित करण्यात आले आहे. मतदारांना काही अडचणी असल्यास 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले.

1 Comment
  1. Son Dakika Ekonomi Haberleri says

    This is getting a bit more subjective, but I much prefer the Zune Marketplace. The interface is colorful, has more flair, and some cool features like ‘Mixview’ that let you quickly see related albums, songs, or other users related to what you’re listening to. Clicking on one of those will center on that item, and another set of “neighbors” will come into view, allowing you to navigate around exploring by similar artists, songs, or users. Speaking of users, the Zune “Social” is also great fun, letting you find others with shared tastes and becoming friends with them. You then can listen to a playlist created based on an amalgamation of what all your friends are listening to, which is also enjoyable. Those concerned with privacy will be relieved to know you can prevent the public from seeing your personal listening habits if you so choose.

Leave A Reply

Your email address will not be published.