निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलंन

0

भुसावळ | प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा २१ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेला थंडावल्या .मात्र दिनांक २३ एप्रिल रोजी होणा-या मतदान प्रक्रियेकरिता पोलीस प्रशासन सज्ज झाले असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी शहर व परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता शहरात आज दिनांक २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पोलिस विभागातर्फे पथसंचलंन करण्यात आले .पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर फौजफाटा बघून गुन्हेगारामध्ये धडकी भरली असून नागरिकांना कुतूहल वाटले .
स्थानिक शहर पोलीस हद्दीमधून उपविभागीय पोलीस अधिक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार, शहर पोलिस निरीक्षक बाळासाहेब ठोंबे, तालुका पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, शहर वाहतूक शाखा निरीक्षक दिपक गांधाले, पीएसआय धारवड, यांच्यासह पोलीस अधिकारी व १५० पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दल, आरसीपी प्लाटून, क्यूआरटी पथक यांचा समावेश होता. शहरातील आठवडे बाजार, सराफ बाजार, मॉर्डन रोड मार्गे रजा टॉवर, अमरदीप टॉकीज, आंबेडकर चौक यामार्गावर पथसंचलन करण्यात आले तर बाजारपेठ पो.स्टे. समोर पथसंचलनाचा समारोप करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.