जिल्ह्यात ६११ नवे बाधित रुग्ण

0

जळगाव (प्रतिनिधी) । जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णाची संख्या अधिक आहे. जिल्ह्यात आज तब्बल ८०९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आजच ६११ नावे बाधित रुग्ण आढळले आहे. यात जळगाव शहरासह भुसावळ, चोपडा आणि पारोळा तालुक्यात रूग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर-१४४, जळगाव ग्रामीण-२१; भुसावळ-९५; अमळनेर-३७; चोपडा-५८; पाचोरा-१६; भडगाव-१५; धरणगाव-३३; यावल-१८; एरंडोल-२२, जामनेर-३३; रावेर-६; पारोळा-६०; चाळीसगाव-२३; मुक्ताईनगर-१२, बोदवड-११ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील ७ असे एकुण ६११ रूग्ण आढळून आले आहेत.

आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या ४४ हजार ९८३ इतकी झालेली आहे. यातील ३४ हजार ३७५ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ८०९ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज ११ मृत्यू झाले असून मृतांचा एकुण आकडा ११२५ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ९ हजार ४८३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.