जिल्ह्यात ४२ नव्या रुग्णांची नोंद ; तर नऊ तालुके निरंक

0

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ४२ कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहे. तर ५५ रूग्णांची कोरोनावर मात केली असून घरी परतले आहे. दरम्यान, आज नऊ तालुक्यात एकही रूग्ण आढळून आला नाही. तर भुसावळ तालुक्यातील एका बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

 

आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ५५ हजार १२१ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी ५३ हजार ४२७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ३८० रूग्ण विविध कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे. आज भुसावळ तालुक्यात १ बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत एकुण १ हजार ३१४ रूग्णांचा मृत्यू झालाय. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

 

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर – २९, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-६, अमळनेर-१, चोपडा-०, पाचोरा-१, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-१, पारोळा-२, चाळीसगाव-२, मुक्ताईनगर आणि बोदवड-० असे एकुण ४२ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.