जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणार्यांची ॲन्टीजन टेस्ट ; १३३ जण आढळले पॉझिटिव्ह

0

जळगाव : जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या २ हजार ६९७ जणांची ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात १३३ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असून त्यांना कोवीड रूग्णालयात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी जिल्ह्यात १५ दिवसांसाठी रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या संकल्पनेनुसार कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व बाधित रूग्ण शोधण्यासाठी रात्री ८ नंतर शहरात संचार करणाऱ्या नागरीकांची रस्त्यावरच ॲन्टीजन टेस्ट करून घेण्याचा उपक्रमास सुरूवात करण्यात आली.

यासाठी अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात प्रत्येक चौकात व नाक्यावर पोलीसांनी डॉक्टरांच्या मदतीने विनाकारण फिरणाऱ्या नागरीकांची ॲन्टजन टेस्ट करण्यास सुरूवात केली. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात २ हजार ६९७ नागरीकांची तपासणी करण्यात आली. यात १३३ बाधित आढळून आले आहे. बाधितांना संबंधित तालुक्याच्या ठिकाणच्या कोवीड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी कळविले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.