कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापनाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कुऱ्हा येथील 2 दुकाने सील

0

कुऱ्हा काकोडा प्रतिनिधी : कोरोना आपत्ती व्यवस्थापनाचे उल्लंघन केल्यामुळे कुऱ्हा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील सोना चांदीचे,मालक, श्री विजय कुमार चौधरी यांचे चौधरी ज्वेलर्स व विलास चिंचोलकर यांचे समर्थ कलेक्शन कापड दुकान वर मुक्ताईनगर तहशिलदार श्वेता संचेती यांनी दुपारी 2 वाजेच्या  सुमारास कारवाई करून पुढील आदेश येईपर्यंत दुकान शील करण्याचे आदेश दिले.

तसेच पुलावर मोठ्या प्रमाणात भाजीपाला व फळ विक्रेत्यांची दुकाने एकाच ठिकाणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे तसेच कुऱ्हा परिसरात काही गावे कोरोनाचा हॉस्पॉट ठरत असून सुद्धा या दुकानाकडे मात्र प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी सुज्ञ नागरिक करत आहे तरी उपाय योजना करण्यात याव्यात कारवाई करतेवेळी मुक्ताईनगरच्या तहसीलदार श्वेता संचेती तलाठी प्रवीण शिंपी आप्पा कुऱ्हा येथील पोलीस पाटील श्री विजय पाटील व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.