जिल्ह्यात भाजपची विजयाकडे घोडदोड – खडसे

0

जळगाव । महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीला ४० च्या वर जागा मिळणार असा अंदाज तर होताच, जळगाव आणि रावेर या दोन्ही जागांवर भारतीय जनता पक्षाला अपेक्षित विजय मिळणार असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी आज दिली.

जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपला विजय मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमिवर, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. ते म्हणाले की, भाजपला दणदणीत विजय मिळाला असून जळगाव व रावेरमध्ये अपेक्षित विजय मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा विकासाचा विजय असल्याचे खडसे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.