जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच ; आज ११७६ नवे रुग्ण, १५ जणांचा मृत्यू

0

जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. मागील काही दिवसापासून दररोज बाराशेच्या आसपास रुग्ण आढळून येत आहे. मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आलेख देखील वातच आहे. आज देखील गेल्या २४ तासात पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात ११७६ नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण ३३३ हे जळगाव शहरात आढळून आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या ९५ हजार ९५८ झाली आहे. तर आज ११७१ कोरोना रुग्ण आजारातून बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे आतापर्यंत बरे होणार्या रुग्णांची एकूण संख्या ८२ हजार ६०० वर गेली आहे. मात्र जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेला कोरोना मृताच आकडा वाढतच आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे, आज १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताच आकडा १७१२ वर गेला आहे. जिल्ह्यात महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्‍टिव्ह रूग्‍णांचा आकडा देखील वाढत आहे. ११ हजार ६४६ रुग्ण उपचार घेत आहे.

जळगाव शहर ३३३, जळगाव तालुका ४१, भुसावळ ४२, अमळनेर ३४; चोपडा १६२; पाचोरा ४३; भडगाव ०८; धरणगाव २८; यावल ८५; एरंडोल ४६, जामनेर ४८; रावेर ६१, पारोळा ३२; चाळीसगाव ५५, मुक्ताईनगर ०३; बोदवड ४५ आणि इतर जिल्ह्यातील १० असे ११७६ रूग्ण आढळून आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.