जिल्ह्यात आज ८७७ नवे रुग्ण आढळले ; १६ जणांचा मृत्यू

0

जळगाव । जिल्ह्यात आज पुन्हा बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा बाधित अधिक आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णही पुन्हा वाढू लागले आहे.आज दिवसभरात ८७७ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर आजच ७२० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.दरम्यान, आज १६ जणांचा मृत्यू झाला आहे,

आज शनिवारी ६ हजार ६३८ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातून ८७७ नवे रुग्ण समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधिताचा एकूण आकडा १ लाख २९ हजार ०४९ वर गेला आहे. त्यापैकी १ लाख १७ हजार ००९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. आज पुन्हा १६  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण मृताचा आकडा २३२० वर गेला आहे. सध्या जिल्ह्यात ९ हजार ७३५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९०.६६ टक्क्यांवर पोहचले आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर १३३, जळगाव ग्रामीण ६२, भुसावळ १०१, अमळनेर २२, चोपडा ४०, पाचोरा ४३, भडगाव १८, धरणगाव ३३, यावल ३१, एरंडोल २३, जामनेर १०१, रावेर ४८, पारोळा २४, चाळीसगाव ९१, मुक्ताईनगर ४०, बोदवड ५५, अन्य जिल्ह्यातील १२ असे एकूण ८७७ नवीन रुग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.