जिल्ह्यात आज ४७ नवे रुग्ण आढळले, एकाचा मृत्यू

0

 जळगाव : जिल्ह्यात आज सोमवारी कोरोनाचे ४७ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर १४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.गेल्या २४ तासात १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असला तरी गेल्या आठवडाभरापासून दररोज बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या पन्नासच्या घरात स्थिर आहे. दिलासादायक बाब म्हणून चार महिन्यांनंतर रविवार आणि सोमवारी एकाही मृत्युची नोंद झाली नाही.

जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १ लाख ४२ हजार ०२९ वर गेली आहे. त्यापैकी १लाख ३८ हजार २४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. आज एका रुग्णांचा मृत्यू झाला असून  जिल्ह्यात आजपर्यंत २५६९ जणांचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यात सध्या १२१७ रुग्ण उपचार घेत आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर-२, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-३, अमळनेर-२, चोपडा-४, पाचोरा-४, भडगाव-१, धरणगाव-३, यावल-३, जामनेर-४, रावेर-४, पारोळा-५, चाळीसगाव-३, मुक्ताईनगर-२, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ४७ रूग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.