जिल्ह्यात आज ४७ नवे कोरोनाचे रूग्ण आढळले ; ०२ रुग्णांचा मृत्यू

0

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात ४७ नवे कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहे. तर आज ४१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. दरम्यान, आज दोन रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

आज प्राप्त कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात ४७ नवीन बाधित आढळून आल्‍याने आतापर्यंत एकुण ५७ हजार ०८१ बाधित रूग्ण आढळून आलेत. त्यापैकी ३४४ रूग्ण ॲक्‍टीव्ह असून कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर ५५ हजार ३७९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. दरम्यान, आज दोन रूग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत मृत रुग्णांची एकूण संख्या १३५८ इतकी आहे.

आजच्या आकडेवारीनुसार

जळगाव शहर-२२, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-१, अमळनेर-०३, चोपडा-०२, पाचोरा-०१, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-०१, एरंडोल-०१, जामनेर-००, रावेर-३, पारोळा-००, चाळीसगाव-०८, मुक्ताईनगर-०४, बोदवड-०० आणि इतर जिल्ह्यातील ०१ असे एकुण ४७ रूग्ण आढळून आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.