कासोदा रस्त्यावरिल अवैध्य वेश्या व्यवसाय कायमस्वरुपी बंद करा

0

पारोळा (प्रतिनिधी) : गेल्या अनेक दिवसापासुन शहरात अनेक प्रकारचे अवैध्य धंदेसह वेश्या व्यवसाय सर्रासपणे सुरु आहे.याकडे लक्ष वेधून वेश्या व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी छावा संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदनादरे करण्यात आली आहे.

कासोदा रस्ता परिसरात खुलेआम वेश्या व्यवसाय सुरु आहे.हे सुरु राहणेकामी कुणाचा आशिर्वाद आहे.याची सविस्तरणे चौकशी होवुन हे तात्काळ बंद करावे अशी मागणी निवेदनात  छावा संघटनेने केली आहे.

तात्काळ अश्या गैरकृत्य करणाऱ्या व्यवसायास आळा न बसल्यास छावा संघटना रस्त्यावर येवुन आंदोलन करेल.याकामी कायदा व सुव्यवस्था बाबतची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची राहील असे निवेदनात नमूद आहे.निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष विजय पाटील,शहराध्यक्ष संदीप पाटील,ज्येष्ठ सल्लागार प्रतापराव पाटील,विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष राजू महाजन,विक्रम पाटील, विकास माळी,पंकज माळी,राजेंद्र माळी,अमोल  बाविस्कर,शुभम ठाकूर,पवन माळी,सुनील मरसाळे,गोपाल माळी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.