जिल्ह्यात आज १४६ नवे बाधित आढळले ; तर ४६ कोरोनामुक्त

0

जळगाव प्रतिनिधी ।  जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. आज दिवसभरात १४६ नवे रूग्ण आढळून आहे आहे. तर आज ४६ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहे. आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील रूग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे प्रशासनाने ही बाब गांभिर्याने घेतली असून आज या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंधाचे संकेत दिले आहेत. या अनुषंगाने गत २४ तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल १४६ नवीन कोरोना बाधीत आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बधिताचा आकडा ५८ हजार ३१९ वर गेला आहे. त्यातून ५६ हजार ०७० रूग्ण बरे झाले आहे. दरम्यान आज एका बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत १३७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ८७९ वर गेली आहे.

दरम्यान, आज आढळून आलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहरातील सर्वाधीक ७८ रूग्ण आहेत. उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण-०४, भुसावळ- ०२, अमळनेर- १८ चोपडा-२०, पाचोरा-०१, भडगाव-०१,धरणगाव-०१, यावल-००, एरंडोल-०३, जामनेर-०२,रावेर-०४, पारोळा-००, चाळीसगाव-०४, मुक्ताईनगर-०८, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०१ असे एकुण १४६ रूग्ण कोरोनाबाधित आढळ

Leave A Reply

Your email address will not be published.