जिल्ह्यात आज १२१ नवीन बाधित आढळले

0

जळगाव : जिल्ह्यात आज दिलासादायक आकडा समोर आला आहे. जिल्ह्यात आज नवीन बाधित १२१ आले असून आणि ४५४ जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.तर आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ५० हजार ७८६ वर गेली आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी होत असून, रुग्ण बरे होऊन घरी जाणे तसेच मृत्यूचे प्रमाणदेखील कमी झाल्याचे दिसत आहे; त्यात रोज नविन बाधितांचा संख्या कमी झाले आहे.  त्यामुळे कोरोनाचा संसर्ग जरी कमी झाला असला, तरी काळजी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शुक्रवारी दिवसभरात १२१ नवे बाधित रुग्‍ण आढळल्‍याने एकूण बाधितांची संख्या ५० हजार ७८६ वर पोचली आहे. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण दुप्पट राहिले असून, बरे होणाऱ्यांची संख्या ४५४ आहे. त्यामुळे आता एकूण बरे होणाऱ्यांची संख्या ४६ हजार २२९ वर पोचली आहे, तर सद्यःस्‍थितीत ३ हजार ३३८ रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९१.०३ टक्क्यांवर आला आहे.

असे आढळले रुग्‍ण 

जळगाव शहर ११, जळगाव ग्रामीण ०, भुसावळ २८, अमळनेर ११, चोपडा १६, पाचोरा ००, भडगाव ००, धरणगाव ३, यावल ६, एरंडोल २, जामनेर ११, रावेर ६, पारोळा १, चाळीसगाव २२, मुक्‍ताईनगर २, बोदवड १ इतर जिल्ह्यातील १ रुग्‍णांचा समावेश आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.