जिल्ह्यात आज पुन्हा बरे होणारे रुग्ण अधिक ; मृताचाही आकडा कमी

0

जळगाव प्रतिनिधी। जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती हळूहळू सुधारू लागली. मागील काही दिवसपासून नव्या रुग्णांबरोबर बरे होणारे रुग्ण अधिक आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे अधिक आहे. आज दिवसभरात ६२२ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आजच ६५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात १० जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ३५ हजार ७६४ वर पोचली, तर ६५२ रुग्ण दिवसभरात बरे झाले असून, बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख २३ हजार ६८१ वर पोचला आहे. दरम्यान,  गेल्या २४ तासांत केवळ ४ हजार २७६ चाचन्याचे अहवाल प्राप्त प्राप्त झाले आहे.  गेल्या २४ तासांत १० बळींची नोंद झाली. त्यामुळे एकूण बळींची संख्या २ हजार ४२७ वर पोचली आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहरात ६२, जळगाव ग्रामीण ३४, भुसावळ ७२, अमळनेर २५, चोपडा ४८, पाचोरा २९, भडगाव ११, धरणगाव १७, यावल ६१, एरंडोल २०, जामनेर ३५, रावेर ५८, मुक्ताईनगर १९, बोदवड ३५, चाळीसगाव ५४, पारोळा २७, अन्य जिल्ह्यातील १५.

Leave A Reply

Your email address will not be published.