जिल्ह्यातील पाणी व चारा टंचाईवर उपाययोजना करा : राष्ट्रवादीची निवेदनाद्वारे मागणी

0

जळगाव :- राज्यासह जिल्ह्याला मोठा दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. या दुष्काळी परिस्थितीमुळे भीषण पाणी व चारा टंचाई निर्माण झाली असून शेतकऱ्याला शेती व पशुधन वाचवणे कठीण झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने त्यावर तत्काळ उपाययोजना कराव्या, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी

या निवेद्नात म्हटले आहे की, चारा टंचाईवर उपाय म्हणून छावणी मंजुरीसाठी ४८ अटी कमी कराव्या, छावणीसाठी ५०० गुरांच्या संख्येची अट शिथिल करावी, प्रत्येकाने केवळ पाच गुरे आणावी ही अटही मागे घ्यावी, गुरांना प्रत्येकी दिल्या जाणाऱ्या अन्नाची मात्रा वाढवावी, प्रत्येक गुरासाठी दिले जाणारे अनुदान वाढवावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर माजी मंत्री गुलाबराव देवकर, रा.कॉ.चे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) अॅड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष (महानगर) नामदेवराव चौधरी, प्रदेशाध्यक्ष (अल्पसंख्यक) गफ्फार मलिक आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.