जिल्हा मध्यवर्ती बँक शिरूड शाखेतील व्यवस्थापक शेषराव पाटील सेवानिवृत्त

0

 अमळनेर (रजनीकांत पाटील):- शिरूड  28/02/2021 रोजी शिरूड शाखेतून जवळपास 4 वर्ष  शेषराव पाटील सेवा  देऊन सेवानिवृत्  होत असल्याने छोटा  सत्कार समारंभ करून त्यांना निरोप देण्यात आला.

 

यावेळी उपस्थित  शिरूड वि.का.सह. सोसा ली शिरूड चेअरमन प्रा. सुभाष जीभाऊ, यांचे बंधू आण्णासो नारायण सुकलाल पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच व्ही. झेड पाटील हायस्कुल चे संचालक नानासो जयवंतराव पाटील यांनी त्यांचा सत्कार केला, तसेच श्री दत्त वाचनालयाचे  अध्यक्ष दादासो शशिकांत पाटील यांनी त्यांचा सत्कार केला .विद्यमान संचालिका जिल्हा बँक जळगाव , ताईसो तिलोत्तमा पाटील यांचे पती श्री बापूसो रवींद्र पाटील तसेच शिरूड बँकेतील कर्मचारी योगेश पाटील यांनी देखील सत्कार केला.

 

तसेच कार्यक्रमाला उपस्थित गावातील प्रतिष्ठित भालेराव पाटील, दिलीपराव पाटील , प्रफुल्ल पाटील , विरभान पाटील ,राजेंद्र मोरे, वसंतराव पाटील ,तसेच गावातील प्रतिष्ठित माणसानि उपस्थित राहुन त्यानं सेवानिवृत्ती नंतर च्या आयुष्यासाठी भरपूर शुभेच्या दिल्या.तसेच श्री शेषराव पाटील  यांनी गावात उत्तम कामगिरी केली. तसेच कायद्यच्या तसेच बँकेच्या धोरणानुसार शिरूड पंचकृषी वाशियाना सेवा दिली असे शशिकांत पाटील कार्यक्रमाचे प्रास्ताविक  केले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या सेवा काळात काय घडले हे सांगून तसेच भावुक होऊन श्री शेषराव पाटील यांनी गावचे तसेच पंचकृषी चे आभार मानले. सदर कार्यक्रम कोरोना नियम पाळून  सॅनिटायजर मास्क चा वापर करून पाच लोकांच्या उपस्थित केला.

Leave A Reply

Your email address will not be published.