जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्वपक्षीय बैठक फिस्कटली; काँग्रेसचा भाजपसोबत जाण्यास नकार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून अनेक नवीन घडामोडी घडतांना दिसत आहे. सर्वपक्षीय आघाडी बैठकीत काँग्रेसने भाजपबरोबर जाण्यास नकार दिल्याने सर्वपक्षीय आघाडीची बैठक फिस्कटली आहे.  काँग्रेसने दोन पर्याय ठेवल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेत सर्वपक्षीय आघाडी होणार नाही हे आज पुन्हा स्पष्ट झाले आहे.

जळगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात सर्वपक्षीय आघाडी बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.  मात्र काँग्रेसने आधीच भाजपा बरोबर न जाण्याची भूमिका स्पष्ट केले होते. आजही बैठकीत त्यांनी भाजप जाण्यास तयार नसल्याचे सांगत पालक मंत्री गुलाबराव पाटील त्यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी महा विकास आघडी तयार करावी नाहीतर कॉंग्रेस स्वबळावर लढणार असे स्पष्ट जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आणि सर्वपक्षीय पॅनल मध्ये आमचा कोणताही संबंध नाही हे स्पष्ट केले.

काँगेसला  दोन जागा मिळाल्या म्हणून नाराज असल्यावर जिल्हाध्यक्ष पवार म्हणाले की. आमची कोणतीही नाराजी नाही काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. काँग्रेस पक्ष भाजपा बरोबर जिल्हा मध्यवर्ती बँके मध्ये जाऊ शकणार नाही त्यांना महाविकास आघाडी तयार करावी नाहीतर आम्ही स्वबळावर लढणार हे स्पष्ट केलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.