जामनेर येथे राखीव पोलीस दल व पोलिसांचे पथसंचालन

0

जामनेर (प्रतिनिधी)  शहरात काल झालेल्या अल्पसंख्याक समाज्यातील दोन गटाच्या वादाचे रूपांत हणारीत होऊन ६ झन जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर व कोरोना संसर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भावावर रोखण्यासाठी शासन व प्रशासन उपाय योजना करीत असून नागरिकांनी गर्दी करू नये म्हणून प्रयत्नशील असतांना नागरिक विनाकारण रोड वर फिरत असून विनाकारण गर्दी करीत असल्याने जामनेर शहरात पोलिसांनी व जिल्हा राखीव पोलीस दला कडून  पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या नेतृत्वाखाली ए पी आय राजेश काळे,डी व्ही सुंदरडे ,आहेर यांच्या सह जामनेर पोलीस कर्मचारी यांनी जामनेर शहरातील मुख्य रस्त्यांवरून तसेच जुना बोदवड रोड,मांडणी नगर ,बशीर नगर गणेश वाडी गांधी चौक मार्गे नगर परिषद समोरील राजमाता जिजाऊ चौकात पथसंचलनाचा समारोप करण्यात आला पथसंचलनाचा उद्देश म्हणजे नागरिकांनी घराबाहेर विनाकारण निघू नये पोलिसांचा वाचक कायम रहावा असे असल्याचे बोलले जात आहे

Leave A Reply

Your email address will not be published.