कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर पोलिसांचे पथसंचालना द्वारे शक्तिप्रदर्शन

0

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन  सुरु असून संचारबंदी सुरु असतांना नागरिक वारंवार नियमांचे उल्लंघन करीत असल्यामुळे पोलिस प्रशासनाने नागरिकांवर वचक निर्माण करण्यासाठी दि. ६ एप्रिल सोमवार रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास डिवायएसपी गजानन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख मार्गाने (रुटमार्च)  पथसंचालन  करण्यात आले.

येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यापासून (रुट मार्च) पथसंचलनास  सुरुवात करण्यात आली.  रुट मार्च शहरातील स्टेशन रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जाम मोहल्ला, रजा टॉवर, खडका रोड, शनि मंदीर वार्डा, बाजार परिसरासह शहरातील मुख्य मार्गावरुन करण्यात आले . यात येथील बाजापेठ पोलिस ठाणे, शहर पो.स्टे.तालुका पो.स्टे.सह स्ट्रायकिंग फोर्सचे कर्मचारी व वाहनांच्या ताफयांचा समावेश होता. सुरुवातीला डिवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठचे पो.नि. दिलीप भागवत, शहरचे पो.नि. बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे पो.नि. रामकृष्ण कुंभार, वाहतुक शाखेचे एपीआय के. टी. सुरळकर, पीएसआय वैभव पेटकर, एपीआय अनिल मोरे. संदीप परदेशी यांच्यासह अधिकारी सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.