जामनेर तालुक्यातील सेतु सुविधा केंद्राकडुन जनतेची लुट

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जामनेर तालुक्यासह शहरातील सेतु सुविधा केंद्र चालकांकडुन जनतेची आर्थिक पिळवणुक होत असुन अव्वाच्या सव्वा दर आकारून  एक प्रकारे लुट केली जात असल्याची तक्रार सर्व पक्षीय कार्यकर्त्यांकडुन तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देवून संबंधित सेतु सुविधा पुरविणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यातआली.

शासनाने नागरीकांना लागणारे विविध दाखले एकाच ठिकाणी व किमान दरात मिळण्यासाठी तालुक्यात साधारण १२४ सेतु सुविधा केंद्र ठेका व करार पद्धतीवर सुरू करण्यात आले. शासनाकडुन सेतु केंद्र धारकांना १० % कमीशन (नफा) देण्यात येत आहे. कोणत्याही सेतु सुविधा केंद्राच्या बाहेर स्पष्ट किंवा  ठळक दिसेल असा दरपत्रकाचा फलक न लावल्याने ३३-६० रुपये द्यायचे असतांना १०० रुपये मोजावे लागत आहे.

तसेच PWS च्या दाखल्यांसाठी ३५० दर आकारले जात आहे.  शासकीय अधिकारी व प्रशासनाचा वचक नसल्याने कारवाईची किंवा दंडाची भिती ऊरलेली नाही. लहान मुलांच्या आधार कार्ड निशुल्क असुन सुविधा केंद्र धारक ५० ते १०० रुपये घेतले जातात. संजय गांधी निराधार योजनेसह विधवा, घटस्फोटीत, अंध, अपंग, दिव्यांग व दुर्धर आजाराने ग्रासलेल्या दुर्बल घटकांचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासकीय फी ३३-६० रूपये असुन प्रती दाखल्याचे १००रुपये घेतले जात आहे.

तालुक्यातील सुविधा केंद्र धारक हे संघटनात्मक व संगनमताने नागरीकांची फसवेगिरी करीत उलट अर्जदारालाच अरेरावीची भाषा करुन पळवुन लावले जात आहे. जामनेर न .प. नगरसेवक शे. रीजवान शे. लतीफ यांनी याबाबत श्रीमती भारदे, (उपजिल्हाधिकारी) तहसिलदार जामनेर, निवासी नायब तहसिलदार, नायब तहसिलदार यांना सुविधा केंद्रधारक यांचा १०० रुपये मागणी करण्याची ऑडीयो रेकॉडींग पाठवली असुन त्याची दखल अद्यापही काही कारवाई होत नसल्याने तहसिल कार्यालयासमोर उपोषणाचा ईशारा देण्यात आला.

त्यावेळी माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक अनिस शेख, रीजवान शे .लतीफ, नुरुद्दीन अमीरुद्दीन, नरमुसाबी रमजान, रुरय्याबी .अ . मुनाफ, बतुलबी शे यासीन, रऊफ शे. मेहमुद, मुसा पिंजारी, अहफाज अहमद, खालीद जकी, यांच्या सह सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.