जामनेरात सामाजिक समता मंच तर्फे संविधान दिवस साजरा।

0

जामनेर(प्रतिनिधी):-आजाचा दिवस भारत भरात संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.  सकाळी दहा वाजता नगर पालिका चौकात संविधान दिनाचा कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक समता मंचाने केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचे नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शिक्षण संस्थेचे सचिव जितू पाटील, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नपा गटनेते डॉ प्रशांत भोंडे,तालुका समरसता प्रमुख रवी पाचपोळ, तालुका कार्यवाह कर्ण बारी, तालुका संघचालक डॉ. सचिन पाचंगे, विभाग समरसता प्रमुख किशोर झांबरे,शाम मुळे,अतिष झाल्टे,कैलास नरवाडे, शेख नाजीम,पुखराज डांगी, डॉ. संजीव पाटील,सुहास पाटील,भगवान सोनवणे,शक्ती सुरवाडे,उल्हास पाटील, सुधाकर माळी, कैलास पालवे, निलेश माळी,जगदीश बैरागी आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.