बोदवड शहरातील गौरक्षण संस्थान येथून दुचाकी लांबवली

0

अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल
बोदवड – शहरातील जामनेर रोडवरील गौरक्षण संस्थान येथून येथील एका व्यक्तीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घडली आहे.
याबाबत अधिक असे की,सुकलाल ईडू भीलाला (वय ३५ रा.नांदगाव,पोस्ट धामणगाव ता.ब-हाणपुर,जि.ब-हाणपुर मध्य प्रदेश) हे आपल्या बोदवड शहरातील जामनेर रोडवरील गौरक्षण संस्थान येथे वास्तव्यास असलेले साळभाऊ महेंद्र साहेबा भीलाला यांच्याकडे भेटीसाठी आले असता दि.२३/१०/२०१९ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांची MP-68,ME- 1921 या नंबरची होंन्डा ड्रिम ११ कंपनीची अंदाजे ४० हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची व लाल पट्टे असलेली दुचाकी लांबवून पोबारा केला.आपण इतरत्र शोध घेतला असता मोटारसायकल आढळून आली नसल्याने आपण बोदवड पोलिसांत फिर्याद देत असल्याचे दुचाकी मालक सुकलाल भीलाला यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
सुकलाल भीलाला यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध बोदवड पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील खरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल श्री.काळे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.